छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिका सर्वसाधारण सभेत प्रत्येक सदस्याने लिखित स्वरूपातच प्रश्न विचारावेत. तसेच ऐनवेळी एकही विषय घेतला जाणार नाही. सभेचे कामकाज शिस्तीतच चालेल. प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांनी याची नोंद घ्यावी, अशी सूचना महापौर समीर राजूरकर यांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांना केली त्यामुळे प्रशासनाचे कामकाज भ्रष्टाचारमुक्त करण्यासोबतच पदाधिकारी, नगरसेवकांना शिस्त लावण्याकडेही महापौरांनी लक्ष केंद्रित केले आहे.
यावेळी भाजपचे गटनेचे प्रा. गोविद केंद्रे, एमआयएम पक्षाचे शेरखान हाजी अब्दुल रहेमान, शिवसेनेचे किशोर नागरे, शिवसेना ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांची उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे महापौर झाल्यानंतर सर्वप्रथम आपण काय करणार, असे निवडणुकीच्या वेळी झालेल्या टॉकशोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुलाखत घेणार्यांनी गमतीत विचारला. मात्र त्यावर अतिशय गांभीयनि उत्तर देत ते म्हणाले, महापौर झाल्यानंतर महापालिकेच्या कामकाजात सर्वप्रथम पादर्शकता आणेल. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या उत्तराचीच अंमलबजावणी करण्यास महापौर समीर राजुरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी सुरुवात केली आहे. विविध विभागांच्या बैठका घेत त्यांनी अधिकार्यांना सूचनाही केल्या आहेत.













